मराठी भाषा संवर्धन पंधरवडा,२०२१
मराठी विभाग
काव्य निर्मिती प्रक्रिया
आणि नवोदितांचे कविसंमेलन
२०२०-२१
अहवाल
लाल बहादूर शास्त्री
कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अँड कॉमर्स, सातारा येथील मराठी विभागातर्फे ‘काव्यनिर्मिती प्रक्रिया आणि
नवोदितांचे कवी संमेलन’ या विषयावर आभासी स्वरुपात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
दि.१८ मार्च २०२१ रोजी ही कार्यशाळा संपन्न झाली.
‘काव्यनिर्मिती प्रक्रिया’ विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विवेकानंद कॉलेज,
कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. भाऊ गोसावी हे आभासी कार्यशाळेत
उपस्थित होते. “व्यक्तींच्या भावभावना, संवेदनशीलता, वैचारिकता, आत्मशोध, समाजिक
आत्मभान जागृत करणाऱ्या कविता जाणून घेणे, त्याचा आस्वाद घेणे यासाठी त्यामागील
निर्मिती प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या
मार्गदर्शन पर भाषणात व्यक्त केले. तसेच नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे यासाठी नवोदित
कवींचे कविसंमेलन देखील आयोजित केले होते.यामध्ये विद्यार्थी, सहभागी प्राध्यापक
सहभागी झाले व त्यांनी आपल्या कविता सादर केल्या.
या आभासी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे
उपस्थित होते. त्यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कविता ही सादर केली. या कार्यशाळेचे
प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक तवर यांनी केले तर आभार प्रा. डॉ.
महेश गायकवाड यांनी मानले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. पूजा खताळ हिने केले. यावेळी
विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment